🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत काँग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर
काँग्रेसबरोबर आघाडी करावयाची झाल्यास लोकसभेच्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात, असा प्रस्ताव आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने जागा वाटप करताना दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्याशी संबंधित गटाला चार जागा दिल्या नव्हत्या. त्यामुळे ते आघाडीसाठी किती पुढे येतात, हे पाहावे लागेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असे विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबतची शक्यता नाकारली नाही.
दरम्यान,एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये आघाडीची बोलणी होऊ शकते.ओवेसी आणि कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत कसा सारखाच आहे असे सांगत ओवेसी यांच्यामागे राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समुदाय वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडीची नवी समीकरणे जुळवून येऊ शकतात, असे संकेत आंबेडकर यांनी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
