बारामती : दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र येण्याची तयारी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. ते बारामतीत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून त्यांनी तयारी दर्शवल्यास आपण दोन पावले मागे घेत, त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत.
तसेच त्यांनी यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर राज्य सरकारनं बंदी आणावी अशी मागणीही केली. दलितांना पुढे करून मराठा समाजातील लोक स्वार्थासाठी अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
