🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला सोबत घेण्याचे संकेत दिली आहे. लोकशाही मानणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी होऊ शकते. एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आघाडीची बोलणी होऊ शकते असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय – प्रकाश आंबेडकर
एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये आघाडीची बोलणी होऊ शकते.ओवेसी आणि कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत कसा सारखाच आहे असे सांगत ओवेसी यांच्यामागे राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समुदाय वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडीची नवी समीकरणे जुळवून येऊ शकतात, असे संकेत आंबेडकर यांनी दिले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे मला मान्य नाहीत – आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
