Share

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे मला मान्य नाहीत – आंबेडकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही देशातील सर्वोच्च पदे आहेत, हे मला मान्य नाही,जनता हीच देशातील सर्वोच्च ताकद आहे. आमच्याकडे ती ताकद आहे आणि आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यासमोर झुकायला भाग पाडू,असे विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच आंबेडकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती देत फडणवीस सरकारला भिडेंना अटक करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला.

भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!