Share

Shivsena | शिवसेना – शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. हा खटला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला असून, न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. अशातच न्यायालयामध्ये राज्यातील सत्तासंघर्षावर आज साडे दहा वाजता सुनावणी पार पडली आहे.

सर्वेच्च न्यायालयाने दिला सत्तासंघर्षावर निर्णय-

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर कोणताही निर्णय दिला नसून, येत्या 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालकडून सांगण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे काही नेते नाराज झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे.

तसेच ही सुनावणी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ राज्याच्या पार पडली असल्याचं समजतं आहे. न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा, अशी उरलेल्या चार न्यायमूर्तींची नावं आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आली होती. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. आता पुढच्या सुनावणीला न्यायायलय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!