🕒 1 min read
बुलढाणा : शनिवारी बुलढाणा येथे शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा जोरदार राडा झाला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनाला धमकीच दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारेंगे, असं म्हणत त्यांनी शिवसेनाला इशारा दिला आहे.
संजय गायकवाड आक्रमकः
बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. तसेच आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला.
पाहा व्हिडीओः
या राड्यामध्ये खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिदेंनी केलेल्या बंडानंतर संजय गायकवाडांनी शिंदेंचं संर्थन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली होती. तर जुन्या पदाधिकाऱ्यांवरील जबाबदारी काढून घेत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यावरुन बुलढाण्यामधील राजकारण तापलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Chandrakant Khaire | जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले
- Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक
- Supreme Court | सुप्रिम कोर्टातून मोठी बातमी! शिवसेना कोणाची? या प्रश्नावर उद्या होणार घटनापीठ स्थापन
- Eknath Shinde | शिवसेनासाठी एकनाथ शिंदे गटाची सुप्रिम कोर्टात धाव, याचिका दाखल
- Solapur। निषेध करणारे सेनेचे नव्हे तर राष्ट्रवादीचे..! सेना उरलीच कुठे? चर्चेतले सावंत पुन्हा वादात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
