🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गट अधिक मजबूत करण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांचे अफाट प्रयत्न सुरू असून त्यांनी आता मिशन विदर्भ बाबत घोषणा केली आहे. यातून उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदेने त्यांची कंबर कसल्याचं दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांचं मिशन विदर्भः
नागपुरात आज दुपारी एक वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवरती किरण पांडव यांच्यावर या पत्रकार परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. आज पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुखांची घोषणा होणार आहे. आशिष जयस्वाल, किरण पांडव, कृपाल तुमने हे लोक घोषणा करणार आहेत.
वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नियुक्ता आज जाहीर होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिंदे गटांची पक्षबांधणी सध्या सुरू आहे.
दरम्यान, 40 आमदारांसोबत बंड करून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला होता. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केली. अशातच आता फडणवीस यांच्या विदर्भात शिंदे मिशन विदर्भ सुरू करत आहे. याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होणार आहे. यातून शिंदे आपला गट अधिक ताकदवान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिषदेत एकनाथ शिंदे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Chandrashekhar Bawankule | धोकेबाजांना पळास्ता करायचे आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Navneet Rana | “तु ठाकरे है, तो मै भी राणा हूं…”, नवनीत राणा एकरी भाषा वापरत उद्धव ठाकरेंवर बरसल्या
- Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी धरला लेझीमवर ठेका
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
- Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
