🕒 1 min read
मुंबई : नवनीत राणा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हनुमान चालीसावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा पेट घेताना दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे राणा दाम्पत्य चांगलेच आक्रमक झाले आहेत. यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणादाम्पत्य सोडत नाही. अशातच जळगावत हनुमान चालीसा पटणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलं होता. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषा वापरत टीका केली.
नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर बरसल्याः
तू ठाकरे है तो मे भी राणा हू, मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच, त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे, अशा शब्दांमध्ये नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला असून तुरुंगामधून निघाल्यावर त्यांना वाटलं की मी तुटून जाईल, असं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मी तुरुंगामधून बाहेर पडले तेव्हा माझ्यात जास्त ताकद आली होती, 14 दिवस, बारा-बारा तास मी तुरुंगात हनुमान चालीसाचं पठण केलं, प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट मी हनुमान चालीसा मध्ये मी पाठ करत होते, जर माझ्या भक्तीत थोडी जरी ताकद असेल तर हनुमंत राय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, आता त्यांच्या घरात उभा राहिला एक सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, असा टोला नवनीत राणांनी ठाकरेंवर लगावला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी धरला लेझीमवर ठेका
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
- Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर
- Shivsena । महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येतोय; शिवसेनेचा शिंदे गटावर प्रहार
- Shivsena । शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार? महापालिकेत अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
