🕒 1 min read
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात आज विरोधीपक्षाच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज राज्यावर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटावर आणि भविष्यात उद्धवणाऱ्या समस्यांवर भाष्य करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. “राज्यातील अनेक धरणांमध्ये सध्या गाळ साचलेला आहे. कोयना धरणासारखी अनेक धरणे आहेत जी ऑगस्टमध्येच भरायला लागली आहेत. मात्र धरणांमध्ये असलेल्या ३० टक्के गाळामुळे धरणांचा पाणीसाठा कमी होतोय. ज्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्येच दुष्काळाची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. तसेच या गाळामुळे पूर येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेच जर हा गाळ काढला गेला तर पूरस्थिती येणार नाही”, असे ते म्हणाले.
राज्यातील अनेक धरणांमध्ये गाळ साचलेला आहे. कोयनासारखी अनेक धरणे आहेत जी ऑगस्टमध्येच भरायला लागली आहेत. धरणांचा पाणीसाठा कमी होतोय, धरणात गाळ असल्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्येच दुष्काळाची समस्या जाणवू शकेल. https://t.co/W9lLVEXugg
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 22, 2022
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “केंद्राने इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. पण मागील मविआ सरकार त्यांच्या विचारांचे नसल्यामुळे दुजाभाव दाखवला गेला. पण आता ईडीच्या माध्यमातून का असेना पण नवीन सरकार आणले आहे. मग आता तरी या सरकारने केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवावा. आता भाजपच सत्तेत असल्यामुळे यावेळी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जाऊ नये.”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावर अजित पवारांची टीका
अजित पवार म्हणाले कि, नगरविकास मंत्री असताना जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीला विरोध होता, आता मुख्यमंत्री झाल्यावर अडीच वर्षांत निर्णय कसा बदललात, असा सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदेंना आठवण करुन देत, आपणच अगोदरच्या विधेयकाचं समर्थन केलं होतं, त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकांमधून सरपंच व नगराध्यक्ष निवडण्यात येत होते. मात्र, तोच निर्णय आता तुम्ही बदलत आहात, तुम्ही घेतलेलाच निर्णय तुम्ही बदलताय, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- Pune | पुणे शहरातील धक्कादायक प्रकार; पुत्र प्राप्तीसाठी पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली अन्…
- Sanjay raut | संजय राऊत तुरुंगात लिहतायेत पुस्तक; पुस्तकातून कोणते गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता
- Aditya Thackeray | बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे आक्रमक!, सभांमधील गर्दी पाहून भाजपही चिंतेत
- Eknath Shinde । “नगराध्यक्ष पदाबाबतचा तो निर्णय मंत्रीमंडळाचा होता, माझा नाही”; शिंदेंच विरोधकांना प्रत्युत्तर
- IND Vs ZIM | शुभमन गिलची बॅट तळपली, झिम्बाब्वेविरुद्ध झळकावले शतक; 290 धावांचे लक्ष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
