🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. कारण संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम ५ सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. मागच्या सुनावणी वेळी राऊतांना २२ ऑगस्ट पर्यंतची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आज पुन्हा न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. तर संजय राऊत सध्या तुरुंगात त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा वाचन आणि लिखाण करण्यात घालवत आहेत. त्यातच राऊत सध्या तुरुंगात पुस्तक लिहीत असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांची आर्थर रोड तुरुंगातील कोठडी आज संपणार होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र आजही त्यांना न्यायालयाने दिलासा दिला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली असल्याने आता त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे. मात्र न्यायालयातून परतत असताना राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरचे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं. राऊत म्हणाले, “माझ्याविरोधात चालू असलेली केस खोटी आहे. या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. प्रवीण राऊत हे माझे फक्त नातेवाईक आहेत. बाकी कशाशीही माझा संबंध नाही.” तसेच सच के साथ लढ सकते है, मगर झूठ के साथ नही!, असं देखील ते म्हणाले.
तर संजय राऊत यांना तुरुंगात रोजचे वर्तमान पत्र आणि पुस्तकं वाचायला मिळत आहेत. तसेच लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टरही देण्यात आले आहेत. रोजच्या वाचनानंतर ते काही टिपण्या लिहून ठेवत आहेत. मात्र त्यांनी केलेलं लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच ते काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार राऊत सध्या एक पुस्तक लिहीत आहेत. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडींवर हे पुस्तक आधारित असणार आहे. त्यामुळे जर राऊत खरंच पुस्तक लिहीत असतील तर त्या पुस्तकातून ते अनेक मोठमोठे गौप्यस्फोट करतील, यात शंकाच नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “नगराध्यक्ष पदाबाबतचा तो निर्णय मंत्रीमंडळाचा होता, माझा नाही”; शिंदेंच विरोधकांना प्रत्युत्तर
- IND Vs ZIM | शुभमन गिलची बॅट तळपली, झिम्बाब्वेविरुद्ध झळकावले शतक; 290 धावांचे लक्ष्य
- Assembly Session 2022 | शंभूराज प्रत्येक गोष्टीत तोंड खुपसून स्वतःच हास करू नका – भास्कर जाधव
- Chhagan Bhujbal। देशात अध्यक्षीय पद्धत लागू करायची आहे का?; नगराध्यक्ष पदाबाबतचाच्या निर्णयावरून भुजबळ संतप्त
- Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी हिचा व्हिल चेअर वरील योगा पाहून व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
