Share

Uddhav Thackrey| “…मोदी पर्व संपण्याची ही कबुली आहे”, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात

Published On: 

मुंबई : मुंबई भाजपच्या षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फडणवीस यांनी मतं मागितली. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर चांगलाच घणाघात केला आहे.

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रीयाः

फडणवीस यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाने मते मागण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच फडणवीस यांनी एक प्रकारे अधोरेखित केलं आहे आणि मोदी पर्व संपण्याची ही नांदी आणि कबुली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मागितली मतंः

दरम्यान, फडणवीस यांनी सभागृहात मुंबईसाठी जे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं ते आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे भाजपला मत द्या, असं वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!