🕒 1 min read
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेला रोजच नवनवीन धक्के बसत आहेत. शिंदे गटाकडून शिवसेना या नावावर आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही हक्क सांगण्यात येत आहे. दोन्ही गटातील हीच लढाई कोर्टात पोहोचली आहे. मात्र ही लढाई शिंदे गटचं जिंकणार अशी शक्यता निर्माण झाली असतानाच आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी येण्याची शक्यता असल्याने कोर्टातल्या याचिकांची सुनावणी त्याआधीच घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात केली होती. यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/barandbench/status/1559408876595777536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559408876595777536%7Ctwgr%5Ee8bfa5f63f665d85eba3f158f7b8aeee51add461%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fplea-of-uddhav-thackeray-faction-of-shivsena-against-eknath-shinde-faction-over-party-symbol-mentioned-before-cji-nv-ramana-pbs-91-3073760%2F
उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यास विलंब होत आहे. या याचिकांवर ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण त्यावेळी ही सुनावणी १२ ऑगस्टला घेण्याचे ठरवले गेले. मग १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल असे वाटत असतानाच पुन्हा हि सुनावणी लांबणीवर पडली. आता हि सुनावणी २२ ऑगस्टला पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असून त्याआधीच हि सुनावणी होणार आल्याने ती रमण्णा यांच्याच खंडपीठासमोरच होणार आहे. विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीदरम्यान रमण्णा यांनी “आम्हाला निर्णय द्यावाच लागेल”, मत देखील नोंदवलं आहे. त्यामुळे या याचिकांवर कोणता निर्णय येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
https://twitter.com/barandbench/status/1559408876595777536
चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका
या प्रकरणात ४ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न घेण्याचा आदेश दिला असून प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. सर्वांचे लिखीत युक्तिवाद पडताळले जातील असंही कोर्टाने सांगितलं आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही असं सूचित करतच पुढील सुनावणीपर्यंत पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असा सूचना दिल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
- Supriya Sule | “घरात बायको पण एवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात” ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला टोला
- Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर 46 हजार कोटींचे साम्राज्य कोण सांभाळणार?
- “हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
- Jitendra Awhad। “बोलण्याची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना सवाल
- Shiv Sena | तुम्ही ‘प्रति-शिवसेना’ भवन उभारलं तरी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान एकच असते; शिवसेनेचा सामानातून हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
