Share

Independence Day | ऐका ढोल ताशावर वाजणारे इन्ट्रुमेंटल राष्ट्रगीत; अमृत महोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. लाखो लोकांच्या प्राणांची आहुती दिली गेली. स्वातंत्र्यसैनिकांचे हाल करण्यात आले. अन्याय, अत्याचार झाले पण तरीही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची जिद्द कधीही कमी पडली नाही. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून या भारत मातेला इंग्रजांच्या जाचातून मुक्त केलं आणि भारत स्वतंत्र झाला. या स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत कानी पडताच आपण क्षणात उभे राहतो. स्वातंत्र्यसैनिकांप्रती आणि या मायभूमीप्रती आपले आभार व्यक्त करतो. आपल्या याच राष्ट्रगीताचे इंस्ट्रुमेंटल व्हर्जन नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. जे ऐकून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाहीत.

राष्ट्रगीताच्या या इंस्ट्रुमेंटल व्हर्जनमध्ये आकर्षणाची गोष्ट आहे ती म्हणजे ढोल-ताशा. आपण अनेक वेळा बासरी किंवा पेटीवर वाजवलेले राष्ट्रगीत ऐकले असेल, पण ढोल ताशावर राष्ट्रगीत वाजवण्याचा हा बहुतेक पहिलाच प्रयत्न असेल. हि भन्नाट कल्पना ओंकार भस्मे यांची असून त्यांनीच याची निर्मितीही केली आहे. याचे संगीत संयोजन ओंकार सूर्यवंशी यांनी केले आहे. तर गणेश बोज्जी यांनी रिदम सुपरव्हिजन केले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ती वादकांची होती. ओंकार सूर्यवंशी, गणेश बोज्जी, ओंकार घाडगे, संकेत सातपुते, शुभम नितनवरे, अजिंक्य गायकवाड यांनी या राष्ट्रगीताचे वादन केले आहे. तर प्रोग्रॅमिंग नवनीत जैन यांनी केले आहे. तसेच याचे व्हिज्युअल स्टुडिओ कोरीऐंडरचे ओंकार मरकळे यांनी केले आहे. राष्ट्रगीताचे हे इंस्ट्रुमेंटल व्हर्जन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!