Share

Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून दिल्ली काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. या निदर्शनात राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेते सहभागी झाले आहेत. त्याचवेळी आंदोलन करताना राहुल गांधी, प्रियंका गांधी, शशी थरूर यांच्यासह इतर अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियंका गांधी यांना चक्क फरफटत नेण्यात आले.

आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “आम्ही लोकशाहीचा मृत्यू पाहत आहोत. या हुकूमशाहीच्या विरोधात जो कोणी उभा राहत आहे, त्याच्यावर हल्ला केला जात आहे. तुरुंगात टाकले जात आहे, मारहाण केली जाते. समाजात महागाई, बेरोजगारी, हिंसाचार अशा अनेक समस्या आहेत. पण या सरकारचा ४-५ लोकांचे हित जपणे हा एकच अजेंडा आहे आणि देशात ही हुकूमशाही २ लोकांकडून २-३ मोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी देश चालवत आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “प्रत्येकाला ते माहित आहे. माझे काम आरएसएसच्या कल्पनेला विरोध करणे आहे आणि मी ते करणार आहे. मी हे जितके जास्त करेन, तितकाच माझ्यावर हल्ला होईल. माझ्यावर जितका हल्ला होईल तितका मला आनंदच होईल, करा माझ्यावर हल्ला”

महाराष्ट्रातही आंदोलने सुरु
दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते भाई जगताप यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी फरफटत नेले आणि ताब्यात घेतले. या आंदोलनांचे पडसाद देशभर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!