🕒 1 min read
मुंबई : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचा आज देशभरात हल्लाबोल सुरू आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. आज देशात हुकूमशाही आहे. लोकशाहीची हत्या झाल्याचे आपण पाहत आहोत. आम्हाला संसदेत चर्चा करू दिली जात नाही, आम्हाला अटक केली जाते, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी संघावर (RSS) देखील टीका केली.
विरोधकांच्या प्रश्नांनंतरही सरकारवर दबाव होताना दिसत नाही, देशातील माध्यमांसह प्रत्येक संस्था सरकारच्या ताब्यात आहेत. प्रत्येक संस्थेत आरएसएसचा एक व्यक्ती बसलेला आहे. आमच्या सरकारने संस्थेवर नियंत्रण ठेवले नाही. आम्ही संस्था स्वतंत्र ठेवायचो. जर कोणी इतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल बोलले तर ईडीसह केंद्रीय यंत्रणा त्याच्या मागे लागतात. त्याविरोधात आम्ही लढत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
जो घाबरतो तो धमकावतो-राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, “देशात बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे, पण भारत सरकार असे नाही म्हणते. कोविडमुळे झालेल्या मृत्यूंबाबतही सरकारने पाठ फिरवली. मी जेवढे सत्य बोलेन, तेवढे माझ्यावर हल्ले होतील. मी लोकशाहीसाठी काम करेन. महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा मी मांडणार आहे. जो घाबरतो तो धमकावतो. आज भारताची स्थिती काय आहे, याची त्यांना भीती वाटते. त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न होण्याची भीती आहे. ते खोटे बोलतात. बेरोजगारी नाही, महागाई नाही, चीनबद्दलही खोटे बोलले. ते माझ्यावर जितके आक्रमण करतात तितके मला आवडते. मी त्यांच्याकडून शिकतो.”
गांघी कुटुंब नाही, ही एक विचारधारा आहे-
राहुल गांधी म्हणाले की, “भारतातील कोणतीही व्यक्ती सरकारच्या विरोधात काही बोलली तर सरकारच्या सर्व संस्था त्याच्या मागे लागतात. लोकशाही ही केवळ विसरलेली आठवण झाली आहे. ते गांधी कुटुंबावर हल्ला करतात कारण आपण एका विचारधारेसाठी आणि लोकशाहीसाठी लढतो आहे. या विचारसरणीला करोडो लोकांचा पाठिंबा आहे आणि हे वर्षानुवर्षे होत आहे. माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी यासाठी जीव देखील दिला आहे. जेव्हा हिंदु-मुस्लिम म्हणून भारताची फाळणी होते किंवा संघर्ष होतो तेव्हा आपल्याला वेदना होतात. हे कुटुंब नाही, ही एक विचारधारा आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Congress । राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत घेऊन गेले
- Thackeray vs Shinde | ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला झटका ; बीड तालुक्यात शिंदे गटाने फडकवला झेंडा
- Rakhi sawant | राखी सावंतच्या बॉयफ्रेंडला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पहा व्हायरल VIDEO
- Sunil Raut। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवणार; सुनील राऊतांचा दावा
- Sunil Raut । संजय राऊतांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं – सुनील राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
