🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे ४ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नऊ तासांच्या छाप्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले होते. तपासात सहकार्य न केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. 1,000 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने त्यांची आतापर्यंत 16 ते 17 तास चौकशी केली.
संजय राऊत यांना रात्रभर कोठडीत ठेवले-
ईडीने संजय राऊत यांना रात्रभर कोठडीत ठेवले. त्यानंतर आज (सोमवार) त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, ईडीने संजय राऊतच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीच्या कोठडीच्या मागणीविरोधात संजय राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांना वैद्यकीय उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेले होते.
कोर्टात सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अॅडव्होकेट अशोक मुंदरगी यांनी कोर्टाला सांगितले, संजय राऊत यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. ते हृदयाशी संबंधित आजाराचे रुग्ण आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत.
ईडीने न्यायालयात काय म्हटले?
यावर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, घोटाळा झालेल्या पैशातून (१.६ कोटी रुपये) अलिबागच्या किहीम बीचवर जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. सपना पाटकर यांच्या नावावर भूखंड घेण्यात आला. प्रवीण राऊत हा संजय राऊतचा फ्रंट मॅन असल्याचेही तपासात समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा, बघू सत्य जिंकते की सत्ता; आदित्य ठाकरेंचं पुन्हा आव्हान
- Vishwajeet Kadam | हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु – विश्वजित कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
