🕒 1 min read
Raj Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच विरोधक अधिक आक्रमकपणे राज्यपालांवर टीका करत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर एक पत्र पाठवल आहे. ते पत्र त्यांनी ट्विट केलं आहे. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो अस इशारा राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे पत्रात ?
कोश्यारींची होशियारी?
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.
जय महाराष्ट्र !
"मराठी माणसाला डिवचू नका!" pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022
दरम्यान, याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई कोश्यारींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, असंही ते म्हणाले.
१०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, संदीप देशपांडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये असंही देशपांडेंनी सुनावलं.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्री केंद्राशी बोलणार – दीपक केसरकर
- Gopichand Padalkar | काका-पुतण्यांना मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये – गोपीचंद पडळकर
- Nitesh Rane | “…तेव्हा त्यांना मराठी माणूस आठवत नाही का?”; नितेश राणेंनी केलं राज्यपालांचं समर्थन
- Eknath Khadse | लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे – एकनाथ खडसे
- Abdul Sattar । लवकरच शिवसेनेचे दहा आमदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
