Share

Sandipan Bhumre : ‘हो एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचेय’,पण…; संदिपान भूमरे स्पष्टचं बोलले

Published On: 

🕒 1 min read

Sandipan Bhumre । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन आहे. यानंतर अनेक नगरसेवक छोटे मोठे पदाधिकारी शिंदे गटात गटात जात आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. यानंतर शिवसेना कोणाची यासाठी आता महाराष्ट्रात वाद सुरु झाले आहेत. दोन्ही बाजूंनी प्रबळ दवे केले जात आहेत. शिंदे यांच्याकडे संख्याबळ जास्त असल्याने ते प्रबळ दावा करत आहेत. यादरम्यान, आता माजी मंत्री संदीपान भूमरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बराखास्त करून, नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. नव्या कार्यकारिणीत दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलीय, तर रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आलीय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावरून शिंदेंवर निशाणा साधलाय.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना अनेकदा म्हटलंय की, शिवसेना कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, पक्षाचे चिन्ह, नाव आपल्यासोबतच राहतील. तसेच एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख व्हायचं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर आता संदीपान भुमरे म्हणाले कि, बाळासाहेब हे फक्त ठाकरे कुटुंबीयांचेच नाही. तर ते सर्वच शिवसैनिकांसाठी वडिलां’समान होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख होण्याचा अजिबात मोह नाही. परंतु, त्यांना पक्षाचे प्रमुख व्हायचे आहे, असे भुमरे म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!