🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्ष बंडखोरीमुळे दुभागला गेला आहे. सध्या शिवसेना कुणाची हा लढा कायद्याच्या चौकटीत अडकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह अजूनही सुरुच आहे. आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. मात्र या सर्व राजकीय उलथापालथी दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. मात्र शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यात अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. बंडखोर आमदारांच्या बाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सडलेले पानं झडून पडली असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून वेगळे झालेल्या आमदारांना उद्देशून बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही गळून पडत आहेत. झाड आता उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Udhdav Thackeray : शिंदे गटाविरुद्धच्या संघर्षात उध्दव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
- Arjun Khotkar | “होय, मी तसं बोललो होतो”; राऊतांच्या खुलास्यावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया
- sanjay raut | खोतकर म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; संजय राऊतांचा खुलासा
- Uddhav Thackeray | “मुले आईला विकायला बाहेर पडली, हे अतिशय…” ; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
- Uddhav Thackeray | “2 नंबरच्या नेत्याने 2 नंबरचे काम केले” ; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल


