🕒 1 min read
मुंबई : क्रिकेटमध्ये पुढील काही महिने टीम इंडियासाठी खूप व्यस्त असणार आहेत. भारतीय संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा हा ६ वर्षांतील पहिलाच दौरा असणार आहे. १८ ऑगस्ट पासून दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय मलिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. कारण मालिका आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीगचा भाग आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी १३ संघांची स्पर्धा थेट पात्रतेचा हा थेट मार्ग आहे.
झिम्बाब्वे सध्या या १३ संघांपैकी १२ व्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने शेवटचा २०१६ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. तेव्हा संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळले होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला यजमानांविरुद्ध ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.
विराट कोहलीला खेळवले जाऊ शकते
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतो. विराटला लयीत आणण्यासाठी निवडकर्ते झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याला पाठवू शकतात, असे मानले जात आहे. कोहली सध्या ब्रेक अंडर टीम इंडियातून बाहेर आहे. भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यातून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत आशिया चषकापूर्वी तो गमावलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू शकतो.
२२ जुलैपासून विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेची सुरुवात एकदिवसीय सामन्याने करणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना २२ जुलै रोजी होणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. दुसरीकडे भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघ ३० जुलैपासून बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.
https://twitter.com/JimmySohail/status/1549648079468503040?s=20&t=1MiGqQOLPAzrxsrwq-gVeg
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde : “राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर”, ओबीसी आरक्षणावरील निर्णयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
- Virat Kohli : विराट कोहलीच्या भन्नाट स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने; पाहा ‘हा’ VIDEO!
- Arvind Sawant : सुप्रीम कोर्टातील निर्णयानंतर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
- Ulhas Bapat | “…तर सरकार बरखास्त होऊ शकतं” ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती
- Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
