Share

Gopichand Padalkar | “शरद पवार कधी घरात बसतात आणि मी…” ; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Published On: 

🕒 1 min read

सांगली : सरकार गेल्याचे सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सत्ता असेल तर जयंत पाटील तुम्ही काम करु शकता. सत्तेच्या विरोधात काम करु शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले होते. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. याला यात अडकावा, असे पोलीसांना सांगण्यात आले होते. पण आम्ही घाबरलो नाही. रोज लढत राहिलो.”

20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर सेना आमदार सुरतला गेल्याची बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखेपर्यंत त्यांचे सुतक गेले नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सांगली जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झाला आहे. नोकर भरतीत देखील प्रचंड भष्टाचार झाला.त्यामुळे बँकेवर प्रशासक लावायची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे देखील गोपीचंद पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!