Share

Amol Mitkari : “… पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना तरी आवडली असती का”, अमोल मिटकरींचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिंदे सरकारने हे निर्णय स्थिगित केले होते. दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावरच ष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारला टोला लगावला.

“मुख्यमंत्री महोदयांनी आज दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये नामांतराबाबत जे निर्णय घेतले हेच निर्णय काही दिवसांपूर्वी मविआ सरकारने घेतलेले होते. जे अल्पमतातील सरकारचे निर्णय असे आपण जरी म्हणालात तरी मात्र कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्हा दोघांचे सरकार तरी टिकेल का?”, असा टोला मिटकरी यांनी लगावला.

तसेच औरंगाबाद शहराचे नाव “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याचा निर्णय प्रत्येकासाठीच अभिमानास्पद आहे. मात्र मागील सरकारने शेतकरी हिताच्या घेतलेल्या निर्णयाला ज्या पद्धतीने आपण थांबविले आहे ही पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना तरी आवडली असती का याचे उत्तर द्यावे. अशी मागणी मिटकरी यांनी ट्वीट द्वारे केली आहे.

दरम्यान नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!