Share

Clyde Crasto : “फडणवीसांनी लक्षात ठेवावे, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण…”, राष्ट्रवादीचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१५ जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी ट्वीट करत टीका केली आहे. 

“देवेंद्र फडणवीस यांनी कितीही साकडे घातले तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ‘सोडली’, पण ‘तोडली’ नाही, आणि भविष्यातही ते शिवसेना ‘फोडतील’ अशी शक्यता वाटत नाही.”, असे ट्वीट क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे. 

दरम्यान यानंतर आता या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “मला असं वाटतं की या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे. त्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकांशी संबंध ठेवणं हे कुठेही गैर नाही. राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं त्यानंतर अनेक नेते त्यांना भेटायला गेले, मी तर स्वतः सभागृहात देखील त्यांना भेटायला जाणार असल्याचं उल्लेख करून सांगितलं होतं. मग मी त्यांना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय आहे? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!