Share

Eknath Shinde : “आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत राज्यात भाजपच्या सहकार्याने शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्या गटातील आमदार आपल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात शामिल करून घेत आहेत. दरम्यान काल रात्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

“मी संजय शिरसाट यांना विचारतो, तुम्ही मुंबईत असता, मग मतदारसंघात काय करायचं? ते बोलले की मतदारसंघ ओके आहे. त्यामुळे आता एकदम ओके वाटतंय. तर काही आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर आहोत हे सांगत आहेत. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे.”, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे. असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान मध्यरात्री असा मेळावा कुणी घेऊ शकत नाही, असेही  शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!