Share

Shahajibapu Patil : भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?; शहाजीबापू म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा एकत्र येणार का, याबाबत साशंकता असताना शिंदे गटातील सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू भोसले-पाटील (Shahjibapu Bhosle Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष एकत्र काम केलं असून  ते एकमेकांचे शत्रू नाहीत. आताचा निर्णय हा परिस्थितीचा असून सत्तेचा नाही.  उद्धव ठाकरे टप्प्या टप्प्याने विचार करुन भविष्यात शिवसेना एकजुटीने काम करताना दिसतील.”, असे शहाजीबापू भोसले-पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले कि, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे सर्व आमदारांच्या मनात आहेत. सर्व आमदारांना शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं असं १०० टक्के वाटतं. तसेच आम्ही कालही शिवसेनेत होतो आणि उद्याही राहणार. काही महिन्यांत जनता शिंदेंच्या नेतृत्वावर नक्कीच शिक्कामोर्तब करेल.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!