🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा फिवर अजूनही उतरलेला नाही. यातच आता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सध्या त्यांच्या आगामी ‘पुष्पा: द रुल’ म्हणजेच ‘पुष्पा- 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, “निर्मात्यांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे. शूटिंगनंतर चार महिने पोस्ट प्रॉडक्शनमध्ये जातील. कारण पहिल्या भागाच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम घाईघाईने करण्यात आले होते. त्यामुळे निर्मात्यांना आता ही चूक पुन्हा करायची नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते 350 कोटी रुपयांहून जास्त मोठ्या बजेटमध्ये ‘पुष्पा- 2’ बनवण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटाचे बजेट पहिल्या भागाच्या बजेटपेक्षा 150 कोटींहून अधिक आहे. ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट सुमारे 195 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 110 कोटींहून अधिक कमाई केली होती.
गेल्या वर्षी 17 डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’मध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पराज’ आणि रश्मिका मंदान्ना ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत दिसले होते. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात फहाद फाजील, सुनील, समंथा रुथ प्रभू, प्रकाश राज, अजय घोष यांच्यासह अनेक स्टार्स दिसले होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखाही खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या. उत्तम अभिनय, थ्रिलर कथा आणि भन्नाट गाण्यांमुळे हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. त्यामुळे आता ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
लवकरच शूटिंग सुरू होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक सुकुमार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत. तसे या भागात काही नवीन पात्र देखील पाहायला मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
