Share

Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार?; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच म्हणाले….

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच जे. पी.नद्दांची    भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असून आषाढी एकादशी झाली कि, आम्ही मुंबईत भेटून याबाबत चर्चा करून आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

लोकांच्या मनात असलेलं सरकार आम्ही स्थापन केले आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सरकार स्थापन करण्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सदिच्छा भेट घेतली असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील घडलेल्या घडामोडींची राज्याने तसेच देशाने नव्हे तर जगाने नोंद घेतली आहे. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी अजूनच वाढली असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!