Share

Trupti Desai : फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या,“त्यांचे पंख छाटले नाहीत तर…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांत मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे व इतर त्यांच्या काही सहकारी आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र भाजपच्या कार्यकाळात पाच वर्षे मुख्यमंत्री पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. भाजपमधून या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटत असल्याचे समोर आले आहे. याच विषयी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी फडणवीस यांची बाजू घेतली आहे.

तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात की, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी हा केलेला प्रयोग आहे. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही.

शिवसेनेतील काही बंडखोर आमदार व इतर काही अपक्ष अशा ५० आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपचा हात धरला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा करताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील तर आपण त्यांना बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री यांच्या शपथविधीला थोडाच वेळ शिल्लक राहिलेला असताना देवेंद्र फडणवीस यांना भाजप पक्षश्रेष्ठी अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेण्याचे सांगितले. या आदेशामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!