Share

Amol Mitkari : पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार; अमोल मिटकरीचं ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार विरोधात दोन याचिका दाखल केल्यात. यावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. यामध्ये बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणाले कि, अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ मविआ चे मुख्यमंत्री महापुजा करतील तोवर बंडखोरांनी गुवाहाटी थांबण्यास हरकत नाही. “एकादशी” तिकडे आणि द्वादशी हिकडे असे ते ट्विटमध्ये म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे पुढील प्रमाणे आहेत. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!