Share

Sanjay Raut : संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे गुवाहाटीला जाण्याच्या तयारीला?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या पाश्वर्भूमीवर संजय राऊत वारंवार बंडखोर नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळत असतानाच एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे.

संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत तसेच ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशी माहितीही सूत्रांनी एका वृत्तावाहीनीला दिली आहे.  सुनील राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील होण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज झाले होते. यातून त्यांना मनातील खदखद दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे बंडखोर 40 आमदारांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. असं असताना त्यांचा सख्खा भाऊ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना घरातच फुटली की काय? असे चित्रही उभे राहत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!