Share

Deepali Sayed : “बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची…”, दिपाली सय्यद यांचा नवनीत राणांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या सर्व  सत्तानाट्यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. यावरच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी नवनीत राणांवर (Navneet Rana) निशाणा साधला आहे.

“राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा ही  शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील, आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे…”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.

दरम्यान राज्यातील सत्तानाट्यावर नवनीत राणा म्हणाल्या, “बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्यायला हवी. राज्यातील संघर्ष पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”. मात्र राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!