Share

Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. या आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आसामचे कॉंग्रेस प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवलं आहे.

पत्रात भूपेन कुमार बोराह यांनी राज्याच्या हितासाठी एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढे पत्रात म्हटलं आहे कि, आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात आणि त्यांचा आदर करतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे. तसेच पुढे पुरामुळे राज्यातील परिस्थिती वाईट आहे आणि आसाम सरकारकडून गुवाहाटीमध्ये तुम्हाला मिळत असलेल्या सुविधा पूर्णपणे अन्यायकारक आणि अस्वीकार्य आहेत. यावरून आसामवर टीका होत आहे, असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले कि, फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिल आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!