Share

Sanjay Raut : “आम्ही हार मानणार नाही ज्यांना…”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विधान परिषद निवडणुकींचा निकाल लागताच राज्यातील राजकीय सूत्रे हलली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारताच शिवसेनेला गळती लागली. याचा फटका महाविकास आघाडीलाही बसला आहे. त्यामुळे संख्येच्या तडजोडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया देत भाजपला तसेच बंड आमदारांना इशारा दिला आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून सांगतो, आम्ही जिंकणार असून आम्ही हार मानणार नाही. ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबई मध्ये यावं. शरद पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना न्याय व्यवस्था चांगली माहित आहे. आम्ही सगळे जण संपर्कात आहोत.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, अनिल देसाई यांची यशवंत चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही आता कायदेशीर लढाई झाली आहे. त्यामुळे पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय म्हणतात? असेही राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!