Share

Lucky Ali : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राज्यकारभारावर गायक लकी अली खुश; म्हणाले,”I love Uddhav..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचाच पक्षातील आमदारांनी धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचा उजवा हाथ समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी सेनेशीच बंड पुकारला आहे. त्यांच्याबरोबर सेनेचे एकूण ५० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राज्यकारभाराचे अगदी मोजक्या शब्दात पण स्पष्टपणे कौतुक केले आहे.

“मला उद्धव ठाकरे आणि त्यांचा राज्यकारभार आवडतो…पूर्णविराम”, अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. लकी अली नेहमीच चालू घडामोडींवर आपले मत व्यक्त करत असतात. सध्याच्या राज्यातील परिस्थितीवरही त्यांनी आपले मत मांडले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीमधीलही अनेक मतभेत, खुलासे समोर येत आहे. सध्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत असल्याची भूमिका मांडली आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात राजकारणात मोठा भूकंप होणार हे मात्र नक्की आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!