Share

“आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत पण…”, उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज १९ जूनरोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधला. अनेक मुद्द्यांवर हाथ ठेवत उद्धव ठाकरेंनी विरोधकांनाही चांगलेच सुनावले आहे.

“आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली असल्याचा इतिहास आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको.”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तसेच मला येणाऱ्या निवडणुकीची चिंता नाही. मी चिंता केली तर तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? विजय-पराभव होतच असते. उद्या तर जिंकणारच त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? त्याचा अंदाज लागलाय त्याचाही उलगडा होईल. शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!