🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये राजस्थान रॉयल्सला उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानला ७ गड्य़ांनी मात दिली. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केलीच, शिवाय फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्विनही फ्लॉप ठरला. अश्विनच्या गोलंदाजीवर गुजरातच्या फलंदाजांनी चौफेर धावा काढल्या. यानंतर राजस्थान संघाचा संचालक कुमार संगकाराने अश्विनबाबत मत दिले.
संगकाराचे मत आहे, की आर अश्विन हा महान क्रिकेटपटू आहे, परंतु त्याने सुधारणेचा विचार केला पाहिजे आणि अधिक ऑफ स्पिन गोलंदाजी केली पाहिजे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी (४४२) घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला अश्विन त्याच्या गोलंदाजीचा अनेकदा ऑफ ब्रेकपेक्षा कॅरम चेंडू जास्त टाकतो. आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत अश्विनची कामगिरी प्रभावी ठरली नाही. त्याने ३ षटकात ३२ धावा दिल्या आणि त्याला विकेटही घेता आली नाही.
Your love made us feel at home. Your love got us this far. ???? pic.twitter.com/FUTwoeKjmT
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
अंतिम फेरीत गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर कुमार संगकारा म्हणाला, ”अश्विनने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने मिळवलेले यश त्याला एक दिग्गज खेळाडू बनवते. तरीही सुधारणेला वाव आहे. विशेषत: त्याने ऑफ स्पिन बॉल अधिक गोलंदाजी करावी.” अश्विनला या मोसमात १७ सामन्यांत केवळ १२ विकेट घेता आल्या. फायनलमध्येही त्याने जास्त कॅरम बॉल टाकले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
