Share

“महाराष्ट्रात कुठेतरी, कुठल्यातरी गावात…”, रितेश देशमुखने पोस्ट केली विलासराव यांची लग्नपत्रिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आई-वडिलांची अर्थातच विलासराव देशमुख यांची लग्नपत्रिका त्याच्या सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्याला साजेसं कॅप्शनही त्याने दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

“29 मे 1975 ज्या दिवशी माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले. महाराष्ट्रात कुठेतरी, कुठल्यातरी गावात आजही कुणाला लग्नाचं आमंत्रण असतं.”, असे ट्वीट करत रितेशने विलासराव आणि वैशाली देशमुख यांची लग्नपत्रिका पोस्ट केली आहे. यातून त्याने वडील विलासराव यांच्यासोबतच्या आठवणी जागृत केल्या आहेत.

https://twitter.com/Riteishd/status/1531137966353297411

दरम्यान इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, १९९९  ते १६ जानेवारी २००३ व १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!