🕒 1 min read
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राज्यसभा उमेदवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्याचे शिवसेनेला रुचल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाजपला टोला लगावला आहे.
“अमरावती शहरात दंगली पेटवण्याचा आरोप असलेले, काँगेस नेत्याचे हात छाटू अशी भाषा करणारे डॉ. अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी… वाह रे भाजप!”, असे ट्वीट मनीषा कायंदे यांनी केले आहे.
अमरावती शहरात दंगली पेटवण्याचा आरोप असलेले, काँगेस नेत्याचे हात छाटू अशी भाषा करणारे अत्यंत ' डॉ अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी…
वाह रे भाजप!#BJP_हटाओ_देश_बचाओ #BJPFailsIndia @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ShivsenaComms @AUThackeray— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) May 29, 2022
दरम्यान भाजपने दुसऱ्या जागेसाठी अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील…”, अमोल मिटकरींचा टोला
- 8 years of BJP : “आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे…”, अमित शाहांची स्तुतीसुमने
- “भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
