🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना दिलेला शब्द मोडला असा आरोप भाजपने केला आहे. राजेंच्या उमेदवारीवरून भाजपने सेनेला निशाण्यावर धरले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपा व त्यांच्या लोकांनी सुरू केले आहे. दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. भाजपाला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी आहे; पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द दिसतात. संभाजीराजे प्रकरणात ते पुन्हा दिसले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणे हे घाणेरडे राजकारण आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या मातीतले निर्मळ मन, सचोटी व मोकळेपणाचा शेवट हे लोक करू पाहत आहेत. त्यांना राज्याचा सामाजिक सलोखा मसणवटीत घालायचा आहे, पण कोल्हापूरच्या मातीतले सत्य अद्याप मेले नाही व छत्रपती शाहू घराण्याची सचोटी संपली नाही हे आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीच दाखवून दिले. फालतू राजकारण करणाऱ्यांचे कान छत्रपती शाहू महाराजांनीच टोचले. कोल्हापूरच्या राजवाड्यात पत्रकारांना बोलावून त्यांनी सांगितले, राज्यसभेच्या जागेचा जो प्रकार झाला, त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा सदैव मान राखला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असे वाटत नाही. हे सर्व भाजपावाल्यांचेच घाणेरडे राजकारण चालले आहे. असे परखड मत छत्रपती शाहूंनीच मांडल्यावर फडणवीस यांचीच कोंडी झालेली दिसते. फडणवीस यांनी संभाजी छत्रपती प्रकरणात उडी घेतली, पण उडी फसली हे स्पष्ट झाले. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
- “…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 GT vs RR Final : चहलचा पराक्रम! आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पिनरनं पटकावली पर्पल कॅप
- IPL 2022 Final GT vs RR : पहिली ट्रॉफी लाखमोलाची..! राजस्थानला धूळ चारत हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सनं पटकावलं विजेतेपद

