🕒 1 min read
मुंबई: छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी आजच्या सामना अग्रलेखातून थेट भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना दिलेला शब्द मोडला असा आरोप भाजपने केला आहे.
संभाजी छत्रपती यांना दिलेला शब्द मोडला. हा शब्द वगैरे देताना फडणवीस तेथे हजर नव्हते. शिवसेना व संभाजीराजे यांच्यात जे घडले ते चार भिंतींतले आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणार आहे व संभाजीराजांनी अपक्ष न लढता शिवसेनेचा उमेदवार व्हावे एवढ्यापुरतीच ही चर्चा मर्यादित आहे. दोघांत राजकीय व्यवहार जमला नाही, मग तो भाजपाशी तरी जमला का? शरद पवार यांनी आधी संभाजीराजांना पाठिंब्यासाठी घोषणा केली आणि नंतर त्यांनी घूमजाव करत पाठिंबा काढून घेतला असे फडणवीस सांगतात. ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
उलटपक्षी संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली ती भाजपानेच. संभाजीराजे फडणवीस यांना भेटले व पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा ‘‘आम्ही संभाजीराजांना पाठिंबा देतोच’’ असे फडणवीस म्हणाले नाहीत. त्यांनी राजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ‘‘विचार करू’’, ‘‘वरच्यांना विचारून निर्णय घेऊ’’ अशी थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱ्या संभाजीराजेंना भाजपानेच सापळ्यात अडकवले. हा त्यांचा जुनाच धंदा आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 GT vs RR Final : चहलचा पराक्रम! आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पिनरनं पटकावली पर्पल कॅप
- IPL 2022 Final GT vs RR : पहिली ट्रॉफी लाखमोलाची..! राजस्थानला धूळ चारत हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सनं पटकावलं विजेतेपद
- IPL 2022 Final GT vs RR : राजस्थानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो..! ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी गुजरातपुढं १३१ धावांचं लक्ष्य
- IPL 2022 GT vs RR Final : लॉकी फर्ग्युसनने फेकला यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू; वाचा!

