🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 Final)चा फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या महामुकाबल्यात गुजरात टायटन्सच्या अप्रतिम गोलंदाजांसमोर राजस्थानचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांना २० षटकात ९ बाद १३० धावा करता आल्या. गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले.
राजस्थानचा डाव
राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. दबावात खेळणाऱ्या यशस्वीने २ षटकार आणि १ चौकार खेचत २२ धावा केल्या, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यश दयालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला (१४) गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने तंबूचा मार्ग दाखवला. १० षटकात राजस्थानने २ बाद ७१ धावा फलकावर लावल्या. १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राशिद खानने देवदत्त पडिक्कलला (२) स्वस्तात झेलबाद केले. तर पुढच्याच षटकात पंड्याने एक बाजू सावरलेल्या बटलरला यष्टीपाठी झेलबाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. बटलरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बटलरनंतर पंड्याने शिमरॉन हेटमायरलाही (११) झेलबाद करत राजस्थानचा अर्धा संघ गारद केला. अश्विनही (६) जास्त काही करू शकला नाही. २० षटकात राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. गुजरातकडून कप्तान हार्दिक पंड्याने १७ धावांत ३ बळी घेतले. आर. साईकिशोरला दोन गडी बाद करता आले.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1530948954665680897
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स : शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
