🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या गुजरातने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव केला. गुजरातने त्यांच्या पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच दिला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या गुजरातने संपूर्ण हंगामात उत्तम खेळ दाखवला होता आणि शेवटी त्यांनी त्याच्या कामगिरीत सातत्य राखले. राजस्थान रॉयल्सच्या स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला बाद करून आयपीएलमध्ये इतिहास घडवला. चहल आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. भारताच्या या दिग्गज गोलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगाला मागे टाकत पर्पल कॅप काबीज केले. यासह चहल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाजही बनला आहे.
फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्ससाठी १७ सामन्यांत १९.५० च्या सरासरीने आणि ७.९२ च्या इकॉनॉमी रेटने २७ बळी घेतले आहेत. तर हसरंगाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी १६ सामन्यात १६.५३ च्या सरासरीने आणि ७.५४ च्या इकॉनॉमीने २६ विकेट्स घेऊन हंगाम संपवला. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पहिला फिरकीपटू बनला आहे. त्याच्या आधी, इमरान ताहिरने २०१९ मध्ये चेन्नईकडून खेळताना २६ बळी मिळवले होते. यावर्षी बंगळुरूच्या वानिंदू हसरंगाने २६ बळी मिळवले आहेत. चहलने त्याची बरोबरी केली, मात्र अंतिम सामन्यात १ बळी घेत त्याने रेकॉर्ड-ब्रेक पराक्रम केला.
महत्त्वाचं म्हणजे, युजवेंद्र चहलने केवळ सर्वाधिक बळीच मिळवले नाहीत तर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिकही घेतली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 3 गडी बाद केले होते. त्याचबरोबर त्याने एका सामन्यात ५ बळीही घेतले. यादरम्यान चहलची इकॉनॉमी चांगली होती आणि त्याने अचूक गोलंदाजी करताना यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी मिळवले.
YUZI CHAHAL becomes the first RR spinner to win the PURPLE CAP ????
????: Disney+Hotstar pic.twitter.com/NXnMsSMApV
— CricTracker (@Cricketracker) May 29, 2022
आयपीएलच्या एका हंगामात फिरकीपटूकडून सर्वाधिक बळी
२७ युजवेंद्र चहल (२०२२)
२६ इम्रान ताहिर (२०१९)
२६ वानिंदू हसरंगा (२०२२)
२४ सुनील नरिन (२०१२)
२४ हरभजन सिंग (२०१३)
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
