Share

धर्मवीर चित्रपटातील बिरजे बाईंनी आनंद दिघेंच्या आठवणींना दिला उजाळा

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. १३ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

शिवसेनचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील बिरजे बाई असे एक पात्र आहे. या चित्रपटातील बिरजे बाई या भूमिकेमुळे हे पात्र सध्या प्रकाश झोतात आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी बिरजे बाईंना शिवसेनेची वाघीन असे म्हंटले होते. आता या बिरजे बाई कशा आहेत, याची उत्सुकता चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असेल. दरम्यान, अनिता बिरजे यांनी आनंद दिघे यांच्या सोबत पक्षात काम करत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.

पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीती रणवीर सिंग याचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून सोशल मिडीयावर चर्चेत होता.

या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे ‘बॉक्स ऑफिसवरील’ कलेक्शन चे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर पहिल्याच दिवशी २.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या टीमने हा आकडा शेअर केला आहे. हा चित्रपट १० कोटींचा आकडा पार करू शकतो अस चित्रपट तज्ञांनी म्हंटल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!