🕒 1 min read
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यामध्ये सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यात येणार आहेत.
एकूण १४ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया थांबवू नका, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान पावसाळय़ानंतर निवडणुका घेण्याची परवानगी आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर जेथे पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्य शासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल
- ११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती
- “कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
