🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज स्पर्धेचा ६५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात खेळवला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा डाव
मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला (९) स्वस्तात बाद करत मुंबईला चांगली सुरुवात मिळवून दिली, पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांनी उत्तम भागीदारी केली. दोघांनी आक्रमक फटके खेळत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. १०व्या षटकात रमणदीप सिंगने गर्गला बाद करत ही भागीदारी मोडली. गर्गने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. त्रिपाठीने निकोलस पूरनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. १८व्या षटकात अर्धशतक ठोकलेला त्रिपाठी बाद झाला. रमणदीपनेच त्याला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. त्रिपाठीने ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. पूरनने २ चौकार आणि ३ षटकारांसह ३८ धावा करत हैदराबादला दोनशेच्या जवळ पोहोचवले. २० षटकात हैदराबादने ६ बाद १९३ धावा फलकावर लावल्या. मुंबईकडून रमणदीपने ३ बळी घेतले.
???????????????????????????? ????????????????????!
Rahul Tripathi's stunning 76 and cameos from Priyam Garg (42) and Nicholas Pooran (38) power #SRH to a total of 193/6. ???? ????#MumbaiIndians chase to begin shortly. ???? ????
Scorecard – https://t.co/U2W5UAx6di #MIvSRH #TATAIPL pic.twitter.com/PqEJk6Sg32
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
