Share

IPL 2022 : विराट कोहलीला मिळणार दणका..! टीम इंडियातून होणार हकालपट्टी? वाचा संपूर्ण बातमी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा त्याचा सर्वात खराब हंगाम आहे. तो तीन वेळा गोल्डन डकचा बळी ठरला आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला क्रिकेटमधून ब्रेक देण्याची मागणी होत आहे. आयपीएलनंतर जूनमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवायचे आहे. दोन्ही देशांदरम्यान पाच टी-२० सामन्यांची मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आयपीएलच्या प्लेऑफदरम्यान केली जाईल. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यापूर्वी चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती विराट कोहलीशी ब्रेकबाबत चर्चा करणार आहे.

टीम इंडियाच्या निवड समितीच्या एका सदस्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले, “हा एक टप्पा आहे ज्यातून प्रत्येक खेळाडू जातो आणि विराटही याच टप्प्यातून जात आहे. यावर तो नक्कीच मात करेल. मात्र निवडकर्ते म्हणून आम्हाला आधी संघाचा विचार करावा लागेल. त्याला क्रिकेटमधून ब्रेक हवा आहे का? याबाबत आम्ही त्याच्याशी चर्चा करू.” कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेतून तसेच आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती दिली जाऊ शकते.

आयपीएल २०२२पूर्वी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने विराट कोहलीने भारतीय टी-२० संघाचे तसेच आरसीबीचे कर्णधारपद सोडले. मात्र त्याच्या या निर्णयाचा काही उपयोग होताना दिसत नाही. कारण आयपीएलच्या या मोसमात तो तीनदा गोल्डन डक ठरला आहे आणि त्याने १२ सामन्यांत १९च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याला केवळ एकदाच पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषकही होणार आहे. भारताने दीर्घकाळापासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघात सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन हे खेळाडू आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक खेळाडू आहेत जे सतत टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत असतात. अशा परिस्थितीत कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला तर त्याची संघातून वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!