Share

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा सुर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर झाला भावूक; वाचा काय म्हणाला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबई इंडियन्स (MI)चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे आयपीएल २०२२ ( IPL 2022)च्या हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. आयपीएलच्या मागील सर्व हंगामांमध्ये दमदार कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स (MI) संघ यंदाच्या हंगामात मात्र सातत्याने सामने गमावत आहे. अश्यातच आता मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांने चाहत्यांचे प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर लवकरच मैदानात परतणार असेही तो म्हणाला.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर नुकतंच सूर्यकुमार यादवने एक ट्वीट केले आहे. ज्यात त्याने असे म्हटले आहे की, “तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि प्रार्थनेने मी लवकरच मैदानात परतेन. मी माझे कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी दुसऱ्या बाजूनं चीअर करेन”.

गुजरातविरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत

मुंबई इंडियन्सने ६ मे रोजी गुजरात टायटन्सला ५ धावांनी हरवले होते. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. आयपीएलचा मेगा ऑक्शन होण्यापूर्वी मुंबईच्या संघाने सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवले होते.

सूर्यकुमार यादवची या हंगामातील कामगिरी

दरम्यान, गुजरातविरुद्ध गेल्या आठवड्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवनं मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात ४३.२९ च्या सरासरीनं ३०३ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवला दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या तीन सामन्यांना मुकावे लागले होते.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!