Share

IPL 2022 : क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने म्हणजे काय रे भाऊ? दोघांमधील फरक माहितीये का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आज म्हणजेच १० मे रोजी लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात स्पर्धा होणार आहे. हे दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. दोघेही ८-८ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. आज जेव्हा हे संघ आमनेसामने येतील तेव्हा त्यांच्या नजरा क्वालिफायरवर असतील. आज जो संघ जिंकेल त्याचे लीगमध्ये १८ गुण असतील, जे क्वालिफायर-१ला पात्र होण्यासाठी पुरेसे असतील. लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ प्रथमच आयपीएलमध्ये सामील होत आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडे पहिल्याच स्पर्धेत क्वालिफायर-१ खेळून इतिहास घडवण्याची संधी आहे.

आयपीएलच्या चालू हंगामात प्लेऑफसाठीची लढत शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक लढत ही करा किंवा मरो अशी झाली आहे आणि एक-एक विजयाने समीकरणे बदलत आहेत. पण सर्व संघांच्या बाबतीत असे नाही. लखनऊ आणि गुजरात यांनी त्यांच्या ११ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. केवळ चमत्कारिक कामगिरीच या संघांना प्लेऑफ खेळण्यापासून रोखू शकते. त्यामुळेच आता या दोन्ही संघांच्या नजरा टॉप-२ वर थांबल्या आहेत.

क्लालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांमध्ये फरक…

गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये असलेले संघच क्वालिफायर-१ म्हणून पात्र ठरतात. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र ठरतात. लीग सामन्यांनंतर, क्वालिफायर-१ सामना अव्वल दोन संघांमध्ये खेळवला जातो. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळते. एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाविरुद्ध ती क्वालिफायर-२ नावाचा दुसरा सामना खेळते. क्वालिफायर-२ चा विजेता अंतिम फेरीत प्रवेश करतो. तर हरलेला संघ स्पर्धेबाहेर होतो.

आयपीएल याआधी इतर कोणत्याही स्पर्धेप्रमाणे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या स्वरूपात खेळले जात होते. पण नंतर ते अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी क्वालिफायर, एलिमिनेटर आणि फायनलचे स्वरूप बदलण्यात आले. त्यामुळे टॉप-४ ऐवजी टॉप-२ मध्ये येण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत सामने रंजक होतात.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!