Share

“…हे देखील भोंग्यांवरून जाहीर करा”, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. असे असतांनाच आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. आज (७ मे ) तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर तसेच मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘घरगुती गॅस चा भाव परत वाढला. तसेच गॅस चे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा’, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ते म्हणाले होते की,‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है…’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!