Share

“मी ‘राज’ मार्गावर आहे आणि राज मार्गावरच…” – वसंत मोरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे याबाबत आंदोलन पुकारले. पण या आंदोलनात वसंत मोरे कुठे दिसले नसल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण  झाले होते. यानंतर वसंत मोरे यांनी आंदोलनात गैरहजर का राहिलो याबाबत प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.

वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही. मला स्वामी विवेकानंद आवडतात. तुम्ही शेवटची वाक्ये घेतली पण पहिली वाक्ये घेतली नाहीत. ज्यावेळेस तुमचा संघर्ष होत असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलतं, अडचणी येतात, तेव्हा तुम्ही असं समजायचं की योग्य मार्गावर आहात. तुम्ही त्यातलं रस्ता बदलाल हे वाक्य घेतलं. पण मी राज मार्गावर आहे आणि राज मार्गावरच राहील,”

“मी गेली १७ ते १८ वर्ष कायम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जातो. तो माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मी आजवर प्रत्येक निवडणुकीनंतर तिरुपती बालाजी इथे दर्शनाला जात आलो आहे. जर निवडणूक झाली तर मला यश मिळणार, हे निश्चित मनात ठेवले होते. त्यामुळे मी तिरुपतीचे बुकिंग करून ठेवले होते आणि निवडणूक झाली नाही, परंतु नियोजित असल्याने मी तिरुपतीला गेलो.”

तसेच पुढे बोलताना म्हणाले, “मनसेचे सर्व नेते माझ्या संपर्कात होते. पण मी कार्यक्रम रद्द केला नाही. कारण याआधी ठाण्याच्या सभेला मला राज साहेबांनी बोलावल्यावर मी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचे लग्न होते. त्या सभेच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. मी माझा घरचा कार्यक्रम रद्द केला आणि ठाण्याच्या सभेला गेलो. मी जर ठाण्यातील सभेला गेलो नाही, तर कार्यकर्त्यामध्ये खूप गैरसमज निर्माण होतील, अशी घरच्या मंडळीची समजूत काढली आणि सभेला गेलो”.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!